blog Images

सरंक्षण क्षेत्रात करिअर घडविणारी अग्रेसर शैक्षणिक संस्था

03 December 2021

डिफेन्स करिअर अकॅडमीचं का?

  आज देशाच्या सरंक्षण क्षेत्राकडे मोठ्या संख्येने तरुण वर्ग आकर्षित होतो आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने युवक सरंक्षण क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उरी बाळगून त्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. यापैकी बरीच तरुण यशस्वी सुद्धा होत आहे. परंतु काही विद्यार्थी क्षमता व गुणवत्ता असून सुद्धा, केवळ योग्य मार्गदर्शन, सराव, सुयोग्य तयारी या अभावामुळे आपलं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत.अशा युवकांसाठी डिफेन्स करिअर अकॅडमी एखाद्या समुद्रात भरकटलेल्या नौकेला ज्याप्रमाणे दीपस्तंभ इच्छित स्थळी पोहचविण्याच कार्य करतो. त्याप्रमाणेच DCA सुद्धा युवकांना त्यांच्या सैन्यभरतीच्या ध्येयापर्यंत पोहचविण्याचे कार्य करत आहे.
  आपल्या आजूबाजूला अनेक संस्था अशा आहेत कि ज्या तरुणांच्या भावनांचा फायदा घेऊन सैन्यभर्तिचे मोठ मोठी आश्वासन देत आहेत. परंतु अनेकांना वाईट अनुभव आल्याने पालक व विदयार्थी जागरूक झाले आहेत. आज हजारो विद्यार्थी व पालक DCA मध्ये प्रवेश घेऊन समाधानी आहेत. कारण DCA फक्त स्वप्नच दाखवत नाही तर ते पूर्ण करण्याची क्षमता व गुणवत्ता तसेच मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना परिपूर्ण बनविते.
  DCA हि महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि अद्वितीय शैक्षणिक संस्था आहे. DCA च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील उद्दीष्टे साध्य करण्यासाठी व्यावहारिक ज्ञान देण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांची निर्णयक्षमता तल्लख होते. स्पर्धेच्या प्रत्येक पायरीवर येणाऱ्या आव्हानात्मक परिस्थितीत ते पूर्णतः तयार असतात. कोणतेही ध्येय गाठण्यासाठी स्वतःचा आत्मविश्वास दृढ असावा लागतो. डीसीए प्रत्येक कॅडेटला स्वतःचा आत्मविश्वास वाढविण्यात आणि यशस्वी नेतृत्व होण्यासाठी सर्व गुण आत्मसात करण्यास मदत करते.
  सर्व सुविधांयुक्त सुसज्ज परिसर आणि पारंपारिक शिक्षण पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडवून त्याचबरोबर अध्यापन पद्धतीत नवनवीन प्रयोग या माध्यमातून डीसीएमध्ये एक अनोखा शिकण्याचा अनुभव मिळतो.
  सैन्यभर्तीचा मार्ग अतिशय खडतर असून या मार्गाने जाण्यासाठी शारीरिक तयारी पेक्षा जास्त मनाची तयारी व निर्धार हवा असतो. म्हणूनच डीसीए विदयार्थ्यांमध्ये निःसंशय धैर्य आणि कधी न डगमगणारा(विलक्षण) निर्धार निरंतर पेटत ठेवते.
  डिफेन्स करिअर अकॅडमीच्या माध्यमातून एनडीए, ऑलिम्पियाड परीक्षा, आरआयएमसी परीक्षा, एनटीएसई, एमटीएसईसाठी आम्ही कॅडेट्स तयार करतो. डीसीए अंतर्गत बारावी व बारावीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी एनडीए - एनए आणि इतर संरक्षण संबंधित परीक्षा अभ्यासक्रम आणि एनडीए व संरक्षण सेवांसाठी तयारी.
अभियांत्रिकी महाविद्यालय, लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय व नेव्हल अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जेईई (मुख्य),एससीआरए व इतर अभियांत्रिकी परीक्षांचा पूर्वतयारी कोर्स. मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी एएफएमसी, एनईईटी आणि इतर वैद्यकीय परीक्षेचा पूर्वतयारी कोर्स.
या सर्व संरक्षण क्षेत्रातील तयारी एका छताखाली एकवटल्या आहेत. अध्यापनचा दीर्घ अनुभव असलेली तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग अभ्यासक्रमासोबतच मुलांचा सर्वांगीण विकास आणि चारित्र्य घडविण्याच्या पवित्र कार्यास संपूर्ण समर्पित आहेत.