मुलींसाठी भारतीय सैन्यदलात आर्मी, वायुसेना किंवा नौसेनेत भरती होण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. सैन्यदलातील करिअरसाठी NDA हा एक महत्वपूर्ण मार्ग आहे. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. दरवर्षी लाखो विद्यार्थी NDA ची प्रवेश परीक्षा देतात आणि यापैकी अनेक विद्यार्थ्यांची देशसेवेसाठी निवडही होते. यापूर्वी फक्त पुरुष उमेदवारच NDA ची प्रवेश परीक्षा देण्यासाठी पात्र होते, मात्र आता महिला उमेदवारसुद्धा ही परीक्षा देऊ शकतील.
आज या ब्लॉगच्या माध्यमातून आपण NDA या परीक्षेविषयी माहिती घेणार आहोत.
NDA भरती परीक्षेचं स्वरूप -
NDA ची प्रवेश परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते, उदा. NDA-I आणि NDA-II. पहिली अधिसूचना जानेवारीत जारी केली जाते आणि दुसरी अधिसूचना जूनच्या आसपास येते. पहिली प्रवेश परीक्षा एप्रिलच्या आसपास आणि दुसरी सप्टेंबरच्या आसपास घेतली जाते.
NDA साठी पात्रता -
अर्ज करू इच्छिणारा उमेदवार भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता -
सेनेत भरती होण्यासाठी -
राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षेत 10+2 पॅटर्नप्रमाणे 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक.
वायुसेना आणि नौसेनेतील भरतीसाठी -
राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठातून परीक्षेत 10+2 PCM पॅटर्नप्रमाणे 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक.
वयोमर्यादा -
केवळ वयवर्षे 16½ ते 19½ या वयोगटातील महिलाही NDA मध्ये सामील होऊ शकतात.
शारीरिक आणि वैद्यकीय पात्रता -
उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
परीक्षेचं स्वरूप -
NDA प्रवेश परीक्षेमध्ये लेखी परीक्षा आणि त्यानंतर बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी यांचा समावेश आहे. लेखी परीक्षेमध्ये दोन पेपर असतात, ज्यामध्ये गणित व सामान्य क्षमता चाचणी, हे पेपर असतात. या परीक्षा उत्तीर्ण झाल्यांनतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाते.
NDA ही परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेतली जाते. यासाठी इच्छुक उमेदवार http://www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात.
मुलींनो तुम्हालाही NDA परीक्षेत यश मिळवायचं असल्यास, महाराष्ट्रातील अग्रगण्य डिफेन्स करिअर अकॅडमी जॉईन करा !
आजच www.dcaaurangabad.org या वेबसाईटला भेट द्या !